शुक्रवार, 5 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (13:06 IST)

जेवण करताना व्यक्तीचा मृत्यू

death of a person while eating food
मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील मालथॉन टोल प्लाझा येथे एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूचा लाइव्ह व्हिडिओ समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक कर्मचारी जेवण करत बसला असताना अचानक तो हादरला आणि खाली कोसळला. तो बेंचवरून जमिनीवर पडला आणि प्राण निघून गेले. मृत्यूचा हा लाइव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 
 
सागर येथील NH 44 राष्ट्रीय महामार्ग मालथॉन टोल प्लाझा येथे गार्ड म्हणून तैनात असलेले उदल यादव ड्युटीवर असताना जेवण करत असतानाच त्यांचा अचानक मृत्यू झाला. ते जेवण करण्यासाठी खोलीत गेले होते, असे सांगितले जात आहे. साथीदारांना समजताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले, उदल बेंचखाली जमिनीवर पडलेला होते, त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्याला तात्काळ वाहनाने सामुदायिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.