शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जुलै 2023 (12:17 IST)

Death threat to PM Modi : PM मोदी आणि CM योगींना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाकडे धमकीचा संदेश देण्यात आला आहे. तसेच 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
धमकीचा संदेश कुठून आला आहे याचा तपास पोलीस लावत आहे. 

मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले की वाहतूक नियंत्रण कक्षात धमकीचा संदेश देण्यात आला. धमकी देणाऱ्याने  देशातील दोन बड्या नेत्यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. इतकेच नाही तर 26/11 सारखे दहशतवादी हल्ले करण्याचे सांगितले आहे. या पूर्वी देखील 22 मे रोजी मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला होता. 
 


Edited by - Priya Dixit