शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 15 मे 2022 (10:34 IST)

'गव्हाच्या निर्यातीवर बंदीचा निर्णय शेतकरी विरोधी'-पी.चिदंबरम

केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणली आहे, सरकारचं हे पाऊल शेतकरी विरोधी असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
 
सरकारने पुरेसा गहू खरेदी न केल्याने ही परिस्थिती उद्भवली असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी म्हटलं आहे.
 
सरकारच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, गव्हाच्या वाढत्या किमती लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. भारत, शेजारी देश आणि इतर देशांची खाद्य सुरक्षा धोक्यात आहे. 'हे पाऊल देशाच्या संपूर्ण खाद्य सुरक्षेवर उपाय आणि शेजारील, गरजू देशांच्या गरजांचे समर्थन करण्यासाठी उचललं आहे.' असंही यात म्हटलं आहे.
 
चिदंबरम म्हणाले, "सरकारने असा निर्णय घेतला कारण केंद्र सरकारला पुरेसा गहू खरेदी करता आला नाही. असं नाहीय की गव्हाचे उत्पादन कमी झाले आहे. खरेदी झाली असती तर निर्यातीवर बंदी घालण्याची आवश्यकता भासली नसती."
 
"गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय शेतकरी विरोधी आहे. सरकारच्या या निर्णयाचे मला आश्चर्य वाटले नाही करण या सरकारने कधीही शेतकरांच्या हिताचे काम केलेले नाही." असंही ते म्हणाले.राजस्थान येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरादरम्यान ते बोलत होते.