शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :नवी दिल्ली , बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (22:26 IST)

दिल्ली : लाच घेताना 'आप'च्या नगरसेवकाला अटक

केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने पूर्व दिल्ली कॉर्पोरेशनच्या आम आदमी पार्टीच्या (आप) नगरसेवक गीता रावत यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे लाचेची रक्कम एका शेंगदाणा विक्रेत्यामार्फत गीता रावत यांच्याकडे गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सनाउल्लाहच्या वडिलांना जेव्हा कळले की आपल्या मुलाला कोणीतरी पकडले आहे, तेव्हा ते आपल्या मुलाच्या हातगाडीकडे धावले. जेव्हा वडिलांनी विचारले की तुम्ही माझ्या मुलाला का पकडले आहे, तेव्हा ते म्हणाले की आम्ही सीबीआयचे आहोत आणि आता तुम्हाला समजेल की आम्ही तुमच्या मुलाला का पकडले आहे. या शेंगदाणा विक्रेत्यामार्फतच नगरसेविका गीता रावत लाच घेत असल्याचे नंतर आढळून आले. विशेष योजना आखत सीबीआयने नोटांवर रंग लावून शेंगदाणा विक्रेत्याला पैसे दिले. ही रक्कम गीता रावत यांना देण्यासाठी शेंगदाणे विक्रेता गेला असता सीबीआयने त्यांना रंगेहाथ पकडले. झडतीदरम्यान एकाच रंगाच्या नोटा जप्त करण्यात आल्या.