बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (19:38 IST)

Delhi : दरोड्यानंतर चोरट्यांनी कार चालकाला रस्त्यावर फरफटत नेऊन हत्या केली

murder
देशाची राजधानी दिल्लीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दरोड्यानंतर चोरट्यांनी कार चालकाला महिपालपूर परिसरात अनेक किलोमीटर रस्त्यावर ओढून नेले. त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती गाडीच्या चाकाखाली अडकलेली दिसत आहे. कारच्या मागून चालत आलेल्या कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवला. जो सध्या व्हायरल होत आहे. 
 
राजधानी दिल्लीतील महिपालपूर येथून एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. येथे दरोडेखोरांनी प्रथम एका व्यक्तीची कार लुटली आणि नंतर त्याला रस्त्यावर फरफटत नेत त्याची हत्या केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ मागून जाणाऱ्या कारमध्ये बसलेल्या लोकांनी बनवला. हा 45 सेकंदाचा व्हिडिओ ज्याने पाहिला त्याला थरकाप झाला.
 
 व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणांनीही या भयानक दृश्यावर आश्चर्य व्यक्त केले. दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हा व्हिडीओ दिल्लीतील महिपालपूर भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची कॅब जात आहे. त्या गाडीच्या उजव्या बाजूला एका व्यक्तीला रस्त्यावर ओढले जात आहे. दरोडेखोरांनी कार लुटली आणि नंतर त्या व्यक्तीला रस्त्यावर ओढून नेल्याचे सांगण्यात आले. यावेळी या गाडीच्या मागे बसलेल्या लोकांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि तो व्यक्ती मरण पावला.
 
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, एका व्यक्तीचा मृतदेह कारमधून ओढल्याचा व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. 10 ऑक्टोबर रोजी, NH8 च्या सर्व्हिस रोडजवळ एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह जखमी अवस्थेत आढळून आला. हरियाणातील फरिदाबाद येथे राहणारा टॅक्सी चालक असल्याचे या व्यक्तीची ओळख पटली आहे.आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
 


Edited by - Priya Dixit