बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 (16:00 IST)

बर्ड फ्लूचा आतंक, दिल्लीत जू बंद

दिल्लीत पुन्हा एकदा बर्ड फ्लू पसरण्याची बातमी आहे. जूमध्ये बर्ड फ्लूमुळे काही पक्ष्यांचे प्राण गेल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने जू बंद ठेवण्यात आले आहे. सध्या तरी तीन- चार दिवस जू आम लोकांसाठी बंद राहील.
 
येथील पीआरओ रियाज खान यांनी सांगितले की 15-16 ऑक्टोबरला जूमध्ये अचानक 9 पक्ष्यांची मृत्यू झाली ज्यात टेड स्टॉर्क, पेलिकंस आणि बदक सामील होते. जू प्रशासनाप्रमाणे हिमाचल, हरियाणा आणि यूपी या बाजूने दरवर्षी काही माइग्रेटरी पक्षी येतात. यातून पेंटेड स्टॉर्क पक्षी दुसर्‍या राज्यांहून जूमध्ये येतात. म्हणून हे संक्रमण दुसर्‍या राज्यांहून आलं असावा असा अंदाज आहे.
 
तपासणीसाठी नमुने जालधंर आणि भोपाल पाठवण्यात आले होते. त्या रिर्पोटप्रमाणे पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण बर्ड फ्लू आहे. जू कर्मचार्‍यांना बर्ड फ्लूचा टीका लावण्यात येत आहे. सध्या तरी इतर पक्ष्यांना बर्ड फ्लूपासून बचावासाठी आवश्यक काळजी घेतली जात आहे.