शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 (17:15 IST)

दारूच्या नशेत शिक्षक शाळेत, प्राथमिक शाळेतील घटना

drunk teacher uttarpradesh news
social media
शाळेत मुले शिक्षण घेतात. शिक्षक मुलांचा पाया बळकट करतात पण शिक्षकच शाळेत मद्यधुंद अवस्थेत येत असतील तर काय म्हणावं. उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये एका शिक्षकाने नशेत शाळेत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक सहायक शिक्षक शाळेतच खुर्चीवर मद्यधुंद अवस्थेत बसलेला दिसत आहे. 
 
हे प्रकरण आहे हमीरपूर जिल्ह्यातील मुस्करा भागातील गलीहामौ गावातील प्राथमिक शाळेचे  एक शिक्षकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाळेतच  शिक्षक धीरेंद्र कुमार यांची मद्यधुंद अवस्था पाहून मुलेही घाबरली.गावातील लोक त्याला उठवत आहेत, मात्र शिक्षक एवढा नशेत आहे. की त्याला काहीच शुद्ध नाही. वर्गात मद्यधुंद अवस्थेत पडलेल्या एका शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आज जिल्हा मूलभूत शिक्षणाधिकाऱ्यांनी   मद्यधुंद अवस्थेत येणाऱ्या या  सहाय्यक शिक्षकाला निलंबित केले आहे.

या प्रकरणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या व्हिडीओ मध्ये मद्यधुंद अवस्थेत शाळेच्या वर्गात पोहोचले आणि खुर्चीवर जाऊन बसले. ते खुर्चीवरच झोपले. शिक्षकांची अशी अवस्था पाहून मुले घाबरले आणि त्यांनी प्राध्यापकांना सांगितले. या घटनेची माहिती सर्वत्र गावात पसरली आणि ग्रामस्थ बघायला आले. शिक्षकाला उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र शिक्षक खुर्चीवरच झोपले होते. गावातील काही लोकांनी टल्ली शिक्षकाचा व्हिडिओ बनवला. सोशल मीडियावर व्हायरल केला.
 
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबत आता सरकारी शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकारी प्राथमिक शाळांमधील मुलांचे शिक्षण रामभरोसे असल्याचे बोलले जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit