बुधवार, 31 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 डिसेंबर 2016 (10:12 IST)

बनावट नोटा प्रकरण मुख्य संशयिताची अनेक खाती सील

duplicate note
कोट्यवधीच्या बनावट नोटा छापल्या प्रकरणी आणि फसवणूक केल्या प्रकरणी  पोलिसांनी अटक केलेला राष्ट्रवादीचा पदाधिकारी छबू नागरेची बँक खाती  पोलीसांनी सील केली आहेत.  त्याच्या सील  खात्यांची संख्या 18 वर गेली आहे. एकुण रक्कम 58 लाख रूपयांपर्यत पोलीसांनी सील केले आहेत.

पोलीस नागरे व संशयीतांच्या बँक खात्यांची चौकशी करत आहेत. पैकी एकाच बँक खात्यांची चौकशी सुरू केली असून आज सापडलेल्या तीन बँकांच्या खात्यात 5 लाख 57 हजार रुपयांची रोकड सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. तर बनावट नोटा छापण्यासाठी नागरेला मदत करणार्‍या साथीदाराचे नाव पुढे आले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.नागरे याने आणि त्याच्या सहकाऱ्यानी एकूण २०० कोटी पेक्षा अधिक रुपयांच्या बनावट नोटा छापल्या होत्या.