शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (09:04 IST)

Earthquake: जम्मू-काश्मीरमध्ये भूकंप

eartquake
ANI
Earthquake in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथे पहाटे 3:49 च्या सुमारास 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, त्यामुळे घरांमध्ये झोपलेल्या स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र, या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. त्याचवेळी डोडा आणि किश्तवाडमध्ये महिनाभरापूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते.
 
याआधी बुधवारी नोएडा, उत्तराखंडमधील पौडी गढवाल आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. राजौरीच्या तुलनेत सर्वच ठिकाणी तीव्रता कमी होती. कुठेही कुठलीही अप्रिय घटना घडल्याचे वृत्त नाही, ही महत्वाची बाब आहे.