गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 डिसेंबर 2023 (17:30 IST)

Earthquake : भूकंपामुळे कारगिल आणि लडाख हादरले

earthquake
जम्मू आणि काश्मीरमधील कारगिल आणि लडाखमध्ये सोमवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दुपारी 3.48 च्या सुमारास भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलमध्ये जमिनीखाली 10 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 इतकी मोजली गेली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली आहे. कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही.
 
 लडाखमध्ये दुपारी 4:10 वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता 3.8 इतकी मोजण्यात आली. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दुपारी 4.01 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 मोजली गेली, त्यानंतर 4.18 वाजता किश्तवाडला आणखी एक भूकंप झाला. त्याची तीव्रता 3.6 इतकी होती.
 
स्थानिक नागरिकांनी सांगितले की त्यांना दोनदा भूकंपाचे हादरे जाणवले. दुसरा धक्का पहिल्यापेक्षा कमी तीव्र होता. अनेक ठिकाणी लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले. अनेकांनी तात्काळ आपल्या प्रियजनांना फोन करून भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती दिली आणि त्यांची प्रकृतीही विचारपूस केली.
 
रिश्टर स्केल वापरून भूकंप मोजले जातात. त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल म्हणतात. भूकंप 1 ते 9 रिश्टर स्केलवर मोजले जातात. भूकंपाचे मोजमाप त्याच्या केंद्रस्थानावरून केले जाते. भूकंपाच्या वेळी पृथ्वीमधून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेची तीव्रता त्यावरून मोजली जाते. ही तीव्रता भूकंपाची तीव्रता ठरवते.
 
Edited By- Priya DIxit