मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मे 2023 (09:19 IST)

Earthquake: उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के

Earthquake
पिथौरागढ. उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गुरुवारी सकाळी हा भूकंप झाला, ज्यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. पहाटे 3:39 वाजता एक सौम्य भूकंप झाला, ज्याची रिअॅक्टर स्केलवर तीव्रता 3.1 एवढी होती. सध्या कुठूनही जीवित व वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
 
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, यापूर्वी जानेवारीमध्येही उत्तर-वायव्य पिथौरागढमध्ये 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता. विशेष म्हणजे उत्तरकाशी आणि पिथौरागढचा परिसर भूकंपाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानला जातो.
 
अलीकडेच पिथौरागढमध्येच3.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. पिथौरागढमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. या वर्षातच तीनदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. 22 मार्च रोजी येथे 3.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातही भूकंपाचे धक्के जाणवले.