सोमवार, 27 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (17:38 IST)

महावितरण 15 डिसेंबरपर्यत वीजबिलासाठी 500 च्या जुन्या नोटा घेणार

electricity bill
राज्य सरकारकडून मिळालेल्या निर्देशानुसार महावितरण वीजबिल भरण्यासाठी दि. 15 डिसेंबर 2016 पर्यन्त घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणार आहे. ग्राहकाचे वीजबिल जेवढ्या रक्कमेचे राहील तेवढ्या रक्कमेच्या जुन्या पाचशेच्या नोटा महावितरण स्वीकारणार आहे. मात्र वीजबिलापोटी आगाऊ स्वरुपात (ऍ़डव्हान्स पेमेंट) रक्कम स्वीकारण्यात येणार नाही. याशिवाय वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in व मोबाईल ऍ़पची सुविधा उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.