बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 4 जून 2023 (13:55 IST)

Farrukhabad : मुलाने सापाचा चावा घेतल्याने सापाचा मृत्यू

white snake
साप हे नाव जरी समोर आले तरी अंगाचा थरकाप उडतो. साप समोर आला आणि त्याने चावा घेतला तर माणसाचा क्षणातच मृत्यू होणं साहजिक आहे. पण सापाचा एका मुलाने चावा घेतल्यावर सापाचा मृत्यू झाल्याची आगळी वेगळी घटना फारुखाबाद येथे घडली आहे. लहान मुलाने चावा घेतल्यावर चक्क सापाचा मृत्यू झाला आहे तर बाळ सुखरूप आहे. 

सदर घटना फारुखाबाद जिल्ह्यातील कोतवाली मोहम्मदबाद मदनापूर गावातील आहे. येथे राहणाऱ्या दिनेश यांचा अडीच वर्षाचा मुलगा अक्षय घरातील अंगणात  खेळत असताना कुठून तरी अंगणात सापाचे पिल्लू अक्षय जवळ आले. चिमुकला अक्षय त्या सापाच्या पिल्लासह खेळू लागला. खेळताना अक्षयने दाताने सापाचा चावा घेतला त्यामुळे साप रक्तबंबाळ होऊन जागीच मरण पावला. अक्षयच्या आजीला सर्व प्रकार समजल्यावर आजीने तातडीने बाळाला रुग्णालयात नेले तिथे त्याच्यावर उपचार सुरु झाल्यावर बाळ सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे.    





Edited by - Priya Dixit