रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (10:19 IST)

राजस्थानच्या पाली येथे भीषण अपघात : 7 जणांचा जागीच मृत्यू

accident
राजस्थानच्या पाली मध्ये जन्माष्टमीच्या मुहूर्तावर भीषण रस्ता अपघात झाला. पाली जिल्ह्यातील रामदेवरा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला चुकीच्या बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टर-ट्रॉलीवरील 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 25 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीएम मोदी आणि उपराष्ट्रपतींनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. 
 
हा वेदनादायक अपघात इतका भीषण झाला की घटनास्थळी सुमारे 100 मीटर अंतरावर मृतदेहांचे तुकडे विखुरले होते . त्याचवेळी मृतदेह आणि जखमींच्या अवस्थेने रस्ताही खराब झाला होता. तसेच मृतदेहांचे अवशेष काढण्यासाठी पोलिसांना अर्धा तास लागला. या घटनेनंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अपघातातील  जखमींना ज्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, तेथेही गोंधळ सुरू आहे. अपघाता नंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
 
पीएम मोदींनी दु:ख व्यक्त केले पीएमओने ट्विट करून म्हटले - राजस्थानच्या पाली येथे झालेला अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे.
 
 या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.