शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2017 (17:12 IST)

जगातील सर्वात लठ्ठ महिलेवर मुंबईत शस्त्रक्रिया होणार

इजिप्तमधल्या अलेक्झॅन्ड्रियामधील इमान अहमद अब्लदुलाती या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय महिलेवर लवकरच मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहे. तीन हजार फूट परिसरात हे हॉस्पिटल उभे केले जात  आहे. यामध्ये एक ऑपरेशन थिएटर, आयसीयू, डॉक्टरांसाठी खोली,  दोन विश्रांतीगृह आणि तळमजल्यावर एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रुम असणार आहे. इमान अहमद यांचं वजन लक्षात घेता त्याआधारे सर्व वस्तूंची उपलब्धता आणि जागेचं बांधकाम करण्यात आलं आहे. यामध्ये 7 फूट रुंद दरवाजे बांधण्यात आले असून, बेडदेखील 7 फूट रुंद असणार आहे.   मुंबईतील प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला ही शस्त्रक्रिया करणार आहेत. याआधी इमान यांनी ट्विटरच्या माध्यमातून डॉ. मुफ्फजल लकडावाला यांच्याकडे मदत मागितली होती. यानंतर लकडावाला यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागत मदतीसाठी ऑनलाइन मोहिमदेखील चालवली होती.