गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (17:25 IST)

नोएडात सेक्टर 3 च्या कारखान्यात भीषण आग, अग्निशमन दलाचे 14 बंब घटनास्थळी

शुक्रवारी दुपारी सेक्टर3 येथील एका प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागली. त्यामुळे घटनास्थळी घबराट निर्माण झाली असून, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझविण्याचे काम सुरू केले. अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आगीमुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आग विझवण्याचे काम सुरू आहे. यानंतर बचाव कार्य केले जाईल.
 
आग कशी लागली हे अद्याप कळू शकलेले नाही तसेच जीवित वा वित्तहानी झाली नाही. त्याचवेळी घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी आग लागण्यामागे शॉर्टसर्किट असू शकते, असे सांगितले. मात्र, अधिकृत निवेदन येणे बाकी आहे.
 
Edited By - Priya Dixit