शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 16 जानेवारी 2022 (13:03 IST)

अझीम प्रेमजींविरोधात याचिका दाखल करणं वकिलांना पडलं महागात

विप्रो कंपनीचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी यांच्याविरोधात एकाच प्रकरणात अनेक याचिका करणं कर्नाटकातील दोन वकिलांना महागात पडलंय.
कर्नाटक हायकोर्टानं या दोन्ही वकिलांना दोन महिन्यांचा तुरुंगवास आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 
अझीम प्रेमजी यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा आरोप करत, या एकाच प्रकरणात ''इंडिया अवेक फॉर ट्रान्स्परन्सी या स्वयंसेवी संस्थेच्या आर सुब्रमणियन आणि पी सदानंद या दोन वकिलांनी एकाहून अधिक याचिका दाखल केल्या होत्या.
गेल्यावर्षी कोर्टानं या संस्थेला याच प्रकरणात 10 लाखांचा दंड ठोठावला होता. मात्र, आता वकिलांनाही दोषी ठरवत, तुरुंगात धाडलं आहे.