सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मुंबईत आरके स्टुडिओ लागली आग

बॉलीवूडचे प्रसिद्ध प्रॉडक्शन हाउस आरके स्टुडिओत आग पेटली. यामुळे एक हॉल पूर्णपणे जळून खाक झालं. हे स्टुडिओ मुंबईच्या चेंबूर येथे आहे. याची स्थापना शोमॅन राज कपूर यांनी केली होती. वर्तमानात याची देखरेख ऋषी कपूर करत आहे.
 
माहितीप्रमाणे ही आग विझविण्यासाठी फायर ब्रिगेडच्या 6 गाड्यांसह पाण्याचे 5 टँकरदेखील मागविण्यात आले आहे. स्टुडिओत वायरिंग काम सुरू होतं त्यादरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग पेटली.