शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बापू भवन आग : मंत्री थोडक्यात वाचले

लखनऊ येथील सचिवालय आणि विधानसभेजवळील बापू भवनमध्ये लागलेल्या भीषण आगीवर ताबा मिळवण्यात यश आलं आहे.  आग लागली त्यावेळी राज्यमंत्री मोहसिन रजा आणि मंत्री धर्मसिंह सैनी तिथे उपस्थित होते. 20 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं. 12 मजली इमारतीच्या दुस-या मजल्यावर आग लागली होती. तिस-या मजल्यापर्यंत आग फोफावली होती. आग लागली त्या ठिकाणी मंत्री आणि अधिकाऱ्यांची कार्यालयं आहेत. आग लागल्यानंतर कर्मचा-यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.  घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आगीवर ताबा मिळवला.