1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 (11:48 IST)

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू;

Uttar Pradesh News
उत्तर प्रदेश मधील फिरोजाबाद जिल्ह्यात सोमवारी रात्री एक मोठा अपघात झाला आहे. शिकोहाबाद पोलीस स्टेशन हद्दीमधील नौशेरा गावामध्ये एका घरात चालत असणारी फटाके कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूच्या घरावरील छत कोसळले आहे. पोलिसांनी ढिगाऱ्याखालून 10 जणांना बाहेर काढले आहे. ज्यापैकी सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर चार लोकांचा मृत्यू झाला आहे.  
 
हा भीषण स्फोट रात्री 10:10 मिनिटांनी नौशेरा गावामध्ये झाला आहे. तसेच जेसीबी, फायर ब्रिगेड, पोलीस घटनास्थळी दाखल झाली. रेस्क्यू ऑपरेशन चालवण्यात येते आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी बेकायदेशीर होती व तपास सुरु आहे. 
 
सोमवारी रात्री अचानक फटाक्यांमध्ये आग लागली. यानंतर भीषण स्फोट झाला तसेच स्फोट एवढा भीषण होता आजूबाजूच्या घरावरील छत आणि भिंती कोसळल्या. तसेच यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

Edited By- Dhanashri Naik