गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 30 एप्रिल 2024 (13:13 IST)

चिकन आणले नाही म्हणून, मुलाने केली जन्मदात्या वडिलांची हत्या

झारखंड राज्यातून एक भयंकर माहिती समोर आली आहे. चिकन आणले नाही म्हणून एका तरुणाने आपल्या जन्मदात्या वडिलांचीच हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. 50 वर्षीय वडील बाजारात भाजी घेण्यासाठी गेले होते. या दरम्यान त्यांचा मुलाने त्यांना चिकन आणण्यास सांगितले. खूप वेळानंतर देखील वडील घरी आले नाही तर रागात येऊन तरुण घरातील कोंबड्या पकडू लागला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी 50 वर्षीय वडील हे भाजी घेण्यासाठी बाजारात गेले होते. तसेच खूप वेळानंतर ते घरी परतले. तसेच त्यांनी येतांना चिकन आणले नाही म्हणून राग आलेला तरुण घरातील कोंबड्या पकडत होता त्याला असे करतांना पाहून त्याचे वडील त्याला रागवायला लागले. या दरम्यान दोघांमध्ये वाद  झाला. रागात असलेल्या तरुणाने बसीला घेऊन वडिलांच्या डोक्यावर वार केलेत. 50 वर्षीय तरुणाचे वडील जमिनीवर कोसळले. झालेल्या वादाच्या आवाजाने परिसरातील लोक घरात पोहचले तर त्यांनी जखमी तरुणाच्या वडिलांना रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टारांनी त्यांना मृत घोषित केले. सोमवारी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. व आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी पोलीस करीत आहेत. 

Edited By- Dhanashri Naik