कोल्डड्रिंकमध्ये अंमली पदार्थ घालून मित्रांकडूनच गँगरेप
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका मुलीवर मित्रांकडूनच सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तिच्या मित्रांकडून विद्यार्थ्यांनी कोल्ड ड्रिंकमध्ये अंमली पदार्थ मिसळून आधी तिला पाजण्यात आले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.
पोलिसांनी पीडित मुलीच्या मैत्रिणीसह तीन विद्यार्थ्यांना आरोपी बनवले आहे. घटनेनंतर सर्वजण फरार आहेत. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणात, विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबासह इंदूरच्या लसुडिया पोलीस स्टेशनमध्ये प्रकरणातील आरोपी विद्यार्थी आणि महिला साथीदाराविरुद्ध सामूहिक बलात्काराची एफआयआर दाखल केली.
तक्रारीनुसार आशिष, निकुल आणि रितेश या तीन विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटोही बनवले आहेत. इंदूरचे एसपी आशुतोष बागरी म्हणाले की, 23 ऑगस्ट रोजी एका खाजगी महाविद्यालयातील प्रथम वर्षाची विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीसह आणि इतर तीन विद्यार्थ्यांसह पिकनिकसाठी मांडव येथे गेली होती, त्यानंतर रात्री परत येताना तिला कोल्ड ड्रिंकमध्ये नशिले पदार्थ देण्यात आले आणि मग तीन विद्यार्थ्यांकडून तिला एका फ्लॅटमध्ये नेण्यात आले, जिथेच मुलीवर बलात्कार झाला.