सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 30 एप्रिल 2022 (12:52 IST)

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी:आता आरक्षणादरम्यान मिळेल कन्फर्म सीट

उन्हाळी हंगामात किंवा सणासुदीत ट्रेनमध्ये आरक्षण करताना, सीट आधीच भरून जाते. अशा परिस्थितीत तिकीट बुकिंग दरम्यान लोकांना जागा मिळत नाही. दुसरीकडे, या कालावधीत तत्काळ तिकीट बुक करणे देखील खूप कठीण काम आहे. काउंटर उघडल्याबरोबर सर्व तत्काळ जागा काही मिनिटांत बुक केल्या जातात.
 
अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रवास करण्यासाठी इतर मार्गांवर अवलंबून राहावे लागत असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन भारतीय रेल्वे अनेक गाड्यांमधील डब्यांची संख्या वाढवणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वे तिकीट बुक करताना सीट कन्फर्म होण्याची शक्यता लक्षणीय वाढणार आहे. उत्तर पश्चिम रेल्वे झोनने 36 जोड्यांमध्ये म्हणजे एकूण 72 गाड्यांमध्ये 81 डबे वाढवण्याची घोषणा केली आहे.त्या मुळे तुम्ही चिंता न करता उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकाल. 
 
* ट्रेन क्र. 22481/22482 दिल्ली सराय रोहिल्ला-जोधपूर-दिल्ली सराई रोहिल्ला ट्रेन जोधपूर ते दिल्ली 1 मे 2022 ते 1 जून 2022 पर्यंत 2 थर्ड एसी आणि 2 सेकंड स्लीपर क्लास कोचसह तात्पुरती वाढवली जात आहे.
 
* ट्रेन क्रमांक 12479/12480  जोधपूर-वांद्रे टर्मिनस-जोधपूर जोधपूरहून वांद्रे टर्मिनसला जाणारी ट्रेन 4 मे 2022 ते 3 जून 2022 पर्यंत तात्पुरती वाढवली जात आहे. यामध्ये 2 थर्ड एसी आणि 2 सेकंड स्लीपर क्लास कोचची संख्या वाढवण्यात येणार आहे.
 
* 1 मे ते 1 जून या कालावधीत भिवानी ते कानपूर, भिवानी-कानपूर-भिवानी या मार्गावर जाणारी ट्रेन क्रमांक 14724/14723 तात्पुरती वाढवण्यात येत आहे. यामध्ये फर्स्ट थर्ड एसी आणि सेकंड स्लीपर क्लासचे डबे वाढवण्यात येणार आहेत.
 
* ट्रेन क्रमांक - 22471/22472, बिकानेर-दिल्ली सराय रोहिल्ला-बिकानेर, या ट्रेनमध्ये 1 मे ते 2 जून या कालावधीत, डब्यांची संख्या तात्पुरती वाढवली जात आहे. यामध्ये 2 सेकंड स्लीपर क्लास कोचची संख्या वाढवण्यात येणार आहे.
 
* ट्रेन क्रमांक - 20473/20474, दिल्ली सराय रोहिल्ला - उदयपूर शहर - दिल्ली सराय रोहिल्ला, या ट्रेनमध्ये 1 मे ते 1 जून या कालावधीत, डब्यांच्या संख्येत तात्पुरती वाढ केली जाईल. यामध्ये 2 सेकंड स्लीपर क्लास कोचची संख्या वाढवण्यात येणार आहे.
 
* ट्रेन क्रमांक - 19666/19665, उदयपूर सिटी-खजुराहो-उदयपूर सिटी, या ट्रेनमध्ये 1 मे ते 3 जून या कालावधीत तात्पुरती वाढ करण्यात आली आहे. यामध्ये 1 थर्ड एसी आणि 1 सेकंड स्लीपर क्लास कोचची संख्या वाढवण्यात येणार आहे.
 
* ट्रेन क्रमांक - 12990/12989, अजमेर-दादर-अजमेर, या ट्रेनमधील डब्यांची संख्या 1 मे ते 30 मे पर्यंत तात्पुरती वाढवली जाईल. यामध्ये 1ल्या एसी कोचची संख्या वाढवण्यात येणार आहे.
 
* ट्रेन क्रमांक - 20483/20484, भगत की कोठी - दादर - भगत की कोठी, 2 मे ते 31 मे या कालावधीत या ट्रेनच्या डब्यांच्या संख्येत तात्पुरती वाढ केली जाईल. यामध्ये 3 थर्ड एसी कोच आणि 3 सेकंड स्लीपर क्लास कोचची संख्या वाढवण्यात येणार आहे.
 
उत्तर पश्चिम रेल्वे झोन एकूण 36 जोड्या गाड्यांचे डबे वाढवणार आहे. अशा परिस्थितीत, भारतीय रेल्वेच्या या पाऊलाचा उन्हाळ्याच्या हंगामात देशातील विविध शहरे आणि गावांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.