शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गोरखपूर , शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (09:45 IST)

गोरखपुरमध्ये ऑक्सीजन पुरवठा ठप्प झाल्याने 30 मुलांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये बीआरडी मेडिकल कॉलेज रुग्णालयातील ऑक्‍सिजनचा पुरवठा बंद केल्याने तब्बल 30 मुलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या मुलांचे मृत्यू मागील 36 ते 48 तासात झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे 9 ऑगस्टलाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बीआरडी मेडिकल कॉलेजचा पाहणी दौरा केला होता.
 
गोरखपूरचे जिल्हाधिकारी राजीव रौतेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मुले एनएनयू वॉर्डमध्ये दाखल होती, तर 17 मुले मेंदूज्वर वॉर्डमध्ये दाखल होती. मागील 48 तासांत 30 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
बाबा राघव दास रूग्णालयात अनेक गरीव रूग्णांवर उपचार केले जातात. मेंदूज्वर विभागातही लहान मुलांवर उपचार सुरू असतात. मात्र गेल्या दोन दिवसांपासून या रूग्णालयात ऑक्‍सिजनची कमतरता भासत होती. या रूग्णालयाचे 69 लाखांचे ऑक्‍सिजनचे बिल थकल्यामुळे पुरवठा बंद करण्यात आला होता. तसेच सिलिंडरही संपले होते. त्यामुळे मागील 48 तासांमध्ये लहान मुलांना आपला जीव गमावावा लागला आहे.
 
रौतेला म्हणाले, मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्‍सीजनची उपलब्धता करून देण्यासाठी संत कबीर नगर जिल्ह्यातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ऑक्‍सीजन पुरवठा करणाऱ्या कंपनीलाही आंशिक भुगतान देण्यात आले होते. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली असून उद्या संध्याकाळपर्यंत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहे. या मृत्यूप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही रौतेला यांनी सांतिगले.