शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राम रहीम यांना 10 वर्षांची कैद

डेरा सच्चाचे प्रमुख बाबा राम रहीम यांना बलात्कार आणि लैंगिक शोषणाप्रकरणी  सोमवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राम रहीम यांना शिक्षा सुनावली जात असताना त्यांना रडू कोसळले. यावेळी रोहतकच्या विशेष कोर्टात फक्त ६ जण होते.

सीबीआयच्या वकिलांनी बाबा राम रहीम यांना १० वर्षांची शिक्षा सुनावली जावी अशीच मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे.
 
बाबा राम रहीम यांना शिक्षा सुनावताना त्यांनी केलेल्या समाजसेवेचा विचार केला जावा अशी मागणी राम रहीम यांच्या वकिलाने कोर्टात केली होती. दोन्ही पक्षांना युक्तिवाद मांडण्यासाठी १० मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता.
 
बाबा राम रहीम यांना रोहतकच्या तुरुंगात ठेवण्यात आले असून त्याच ठिकाणी असलेल्या विशेष न्यायलायात ही शिक्षा त्यांना सुनावण्यात आली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर आता बाबा राम रहीम यांचे वकील हायकोर्टात जामिनाचा अर्ज करू शकतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा हिंसाचार उसळू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.