शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 (11:01 IST)

फरार खलिस्तानी दहशतवादी हरमिंदर सिंग मिंटूला अटक

नवी दिल्ली- पंजाब आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत खलिस्तानी दहशतवादी हरमिंदर सिंह मिंटूला सोमवारी अटक करण्यात आली. मिंटू रविवारी सकाळी पंजाबच्या नाभा तुरुंगातून सुरक्षा व्यवस्था भेदून पाच कैद्यांसह फरार झाला होता.
सूत्रांप्रमाणे मिंटूने आयएसआयहून ट्रेनिंग घेतली असून तिथूनच त्याला आर्थिक मदत मिळते.
 
रविवारी सकाळी हरमिंदर सिंह मिंटू आणि आणखी पाच कैदी तुरुंगातून पळून गेले होते. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी एका व्यक्तीला अटक करून त्याची चौकशी केली. नंतर सापळा रचून दहशतवादी हरमिंदर सिंह मिंटूला दिल्लीतून अटक करण्यात आली.
 
पोलिसांनी कैद्यांना पळून जाण्यास मदत करणार्‍यांपैकी एकाला परमिंदर सिंह याला उत्तर प्रदेशहून अटक केली. परमिंदरच्या चौकशीअंती पोलिसांनी दिल्लीतून दहशतवादी हरमिंदर सिंह मिंटूला अटक केली. इतर कैदी गुरप्रीत सिंह, विक्की डोंगरा, नितिन देओल, विक्रमजीत सिंह आणि विक्की या पाचजणांचा शोध अद्याप सुरू आहे.