suvichar

काश्मीरमध्ये हिजबुल कमांडर 'सबजार बट'चा खात्मा

काश्मीरमध्ये भारतीय सेनेला मोठे यश हाती लागले आहे. सूत्रांप्रमाणे पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी हिजबुल कमांडर सबजार भट्ट याचा खात्मा केला आहे. हा दहशतवादी बुरहान वाणीचा साथीदार होता. 
बुरहान वाणीनंतर हिजबुलची जबाबदारी मूसाकडे देण्यात आली होती. मूसाने हिजबुल सोडल्यावर सबजार भटला ही जबाबदारी सोपवली गेली होती. सबजारवर 10 लाख रूपये बक्षीसही ठेवण्यात आले होते.
 
सूत्रांप्रमाणे सर्व दहशतवादी त्रालमधील सेमोह गावात एका घरात लपले होते. सैन्याला याची खबर मिळाली आणि शोध सुरू असतानाच या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरमध्ये सबजार ठार झाला. मात्र अन्य दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments