शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 5 सप्टेंबर 2024 (11:47 IST)

मंदसौरमध्ये भीषण अपघात, स्कॉर्पिओ आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला असून, येथे भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.   
 
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री दिल्ली मुंबई एक्स्प्रेसमध्ये तीन मित्र स्कॉर्पिओमधून प्रवास करत असताना हा अपघात झाला. यात पिकअप चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. शामगड पोलीस घटनास्थळी पोहोचले व पाहणी केली असता पोलिसांनी सांगितले की स्कॉर्पिओ चुकीच्या बाजूने येत होती आणि पिकअपला धडकली.
 
तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवले. व मृतांच्या कुटुंबियांना अपघाताची सूचना देण्यात अली असून पुढील तपास शामगढ पोलीस करीत आहे.  

Edited By- Dhanashri Naik