मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (22:09 IST)

कॉंग्रेसचा राष्ट्रवादीला धक्‍का, शेकडो नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

Hundreds of corporators joined the Congress
परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष विनोदराव बोराडे यांच्यासह 20 नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर नांदेड, औरंगाबादमधील राष्ट्रवादीच्या महत्त्वपूर्ण पदाधिकार्‍यांचा तसेच भाजपच्याही कार्यकर्त्यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे.
 
औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, एमआयएम व इतर पक्षातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 
 
स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये मेगा भरती सुरु झाली आहे.