शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (09:29 IST)

कर्नाटकात घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या

कर्नाटकमधील मंगळुरु शहरापासून काही अंतरावर असलेल्या कुंदापूरच्या ब्रह्मावर तालुक्यातील सालिग्राम कक्कर पडुवली येथे शुक्रवारी सकाळी घरगुती वादातून संतप्त झालेल्या पतीने पत्नीची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार नऊ महिन्यांपूर्वीच दोघांचे लग्न झाले असून आरोपी पतीला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
 
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाली. व आरोपीला हत्येच्या आरोपाखाली अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार यांचे नऊ महिन्यांपूर्वी लग्न झाले असून ते गेल्या तीन महिन्यांपासून साळीग्राम कक्कर पडुवली येथे भाड्याच्या घरात राहत होते.
 
नवविवाहित जोडप्यामध्ये वारंवार भांडणे होत होती आणि शुक्रवारी सकाळीही दोघांमध्ये वाद झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह ताब्यात घेऊन अजर्कड जिल्हा रुग्णालयात  पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, कोटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.