मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 मार्च 2024 (14:57 IST)

महागडी लिपस्टिक वरून नवरा-बायकोत घटस्फोट

नवरा बायकोत भांडण होणं सामान्य आहे. मात्र हे भांडण विकोपाला गेल्यावर त्यांच्यात घटस्फोट होतात. पण एका लिपिस्टिक वरून घटस्फोट होणे हे नवलंच आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली आहे. 
नवऱ्याला बायकोने 10 रुपयांची लिपस्टिक आणायला सांगितलं होतं  मात्र नवऱ्याने 30 रुपयाची लिपस्टिक आणली म्हणून दोघांमध्ये भांडण झाले आणि बायको रुसून माहेरी निघून गेली. एवढेच नाही तर पत्नीने पतीच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आता हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्राकडे गेलं आहे. या दोघांना आता समुपदेशन देण्याचं काम सुरु आहे. 
 
हे प्रकरण आग्रा येतील असून नवरा एका खासगी कंपनीत कामाला आहे. बायकोनं नवऱ्याला 10 रुपयाचं लिपस्टिक आणायला सांगितले होते. मात्र नवऱ्याने बाजारातून 30 रुपयांचं लिपस्टिक आणलं बायकोने ते महागडं लिपस्टिक पहिले आणि जमिनीवर फेकले या वरून दोघात वाद सुरु झाले. नवरा वायफळ खर्च करतो भविष्यासाठी पैसे वाचवत नाही अशी तक्रार करत तिने पोलिसांत  नवऱ्याची तक्रार केली आहे. ती महिन्याभरापासून माहेरी आहे. पत्नीला मुलांसाठी पैसे वाचवायचे आहे. नवरा पैसे खर्च करतो. या वरून दोघात वाद झाला. आता समुपदेशानंतर दोघांमध्ये सामंजस्य करार झाले आहे. 
 
 Edited by - Priya Dixit