बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

hyderabad मध्ये येणारा रोबो पोलिस Video

अनेक हॉलीवूडपटांमध्ये आपण रोबोंना वेगवेगळी कामगिरी करीत असताना पाहिलेले आहे. अगदी पोलिसाची भूमिका बजावणारेही रोबो आहेत. दुबईतही आता असा रोबो पोलिस अवतरला आहे. अर्थात त्याच्याकडे केवळ आपण आपली तक्रार नोंदवण्याचे काम 
 
करू शकतो. तरीही पोलिस दलात आता अशी रोबो भरती होणे हे नव्या काळाचे घोतक आहे. आता आपल्या देशातही पोलिस दलात रोबोचे पदार्पण होत आहे.
 
भारतातील पहिला रोबोकॉप अर्थात यंत्रमानव पोलिस हैदराबादमध्ये येणार आहे. तेलंगाणातील एच-बॉट्स रोबो‍टिक्स ही कंपनी या सहा फूट उंच रोबोकॉपची निर्मिती करणार आहे. कंपनीने नुकतीच हैदराबादमध्ये रोबोटिक्स व हार्डवेयर निर्मिती कारखान सुरू 
 
केला आहे. कंपनीने या रोबोकॉपचे नमुने विकसित करण्याचे काम अगोदरच सुरू केले आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.