सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आणि जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला डिस्चार्ज देण्यात आला. उपचारांनंतर इमानचे वजन आता 176 किलो एवढे झाले आहे. यापुढील उपचारांसाठी इमान अबुधाबी येथील बर्जिल रुग्णालयात दाखल होणार आहे. इमानला सैफी रुग्णालयातून मुंबई विमानातळापर्यंत ग्रीन कॉरिडोरने नेण्यात आले. इजिप्तसाठी पुढील प्रवास एअरबस-३००ने प्रवास करणार आहे. इमानला अबुधाबी येथील बर्जिल रुग्णालयात दाखल करण्यात येईल. इमानसोबत व्हीपीएस हेल्थकेअरच्या चमूमधील डॉक्टर्स, परिचारिका असणार आहेत. तसेच तिची बहीण शायमासुद्धा सोबत राहणार आहे. दरम्यान, इमानला डिस्चार्ज दिल्यानंतर बहिण शायमाने इमानवर उपचार केल्याबद्दल सैफी रुग्णालयाचे आभार मानले.