रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 14 जून 2017 (17:24 IST)

चालू वर्षात अनिल अंबानी एक रुपयाही पगार घेणार नाही

रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम) कंपनीकडून 2017-18 या आर्थिक वर्षात एक रुपयाही पगार घेणार नाहीत. तर कंपनीच्या व्यवस्थापनानेही 21 दिवसांचा वैयक्तिक पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल अंबानी यांनी स्वतःच्या इच्छेने हा निर्णय घेतल्याची माहिती आरकॉमने एका पत्रकाद्वारे दिली आहे. आरकॉम कंपनीवर मोठं कर्ज आहे आणि या कर्जाची परतफेड करण्यासाठी केवळ सात महिन्यांचा कालावधी उरला आहे. कंपनीला 45 हजार कोटी रुपयांची परतफेड यावर्षी डिसेंबरपर्यंत करायची आहे. कंपनीने डिसेंबरपर्यंत 60 टक्के कर्ज कमी करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यानंतर कंपनीवर 20 हजार कोटींचं कर्ज राहिल.