मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (10:14 IST)

दोन-तीन दिवसांत कोळशाचा पुरवठा वाढवणार, वीज संकटाबाबत केंद्राची माहिती

कोळशाच्या तुटवड्यामुळं निर्माण झालेल्या ब्लॅकआऊटच्या संकटावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 

कोळशाचा पुरवठा वेळेवर करण्यात आला नाही तर अनेक राज्यांमध्ये वीजसंकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र कोळशाच्या पुरवठ्याच्या संकटामागं विविध कारणं असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.
 
अर्थव्यवस्थेला वेग येत असल्यानं वीजेची मागणी वाढली आहे. तसंच कोळशा खाणींच्या भागातील प्रचंड पाऊस, आयात होणाऱ्या कोळशाचे वाढलेले दर आणि कोळसा कंपन्यांकडे असलेली थकबाकी, या कारणांमुळं हे संकट निर्माण झाल्याचं ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं.
 
कोळसा मंत्रालयाच्या नेतृत्वात आठवड्यातून दोन वेळा कोळशाची उपलब्धता तपासली जात आहे. आगामी तीन दिवसांत अपेक्षित पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार अल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.