1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 10 मे 2025 (09:56 IST)

भारत पाकिस्तान तणाव: भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचे मोठे नुकसान, सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट

पाकिस्तानने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी देखील भारतातील २० हून अधिक शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले. यामध्ये तुर्की बनावटीच्या ड्रोनचा वापर केल्याच्या बातम्याही आहे. प्रत्युत्तर म्हणून भारतानेही मध्यरात्री पाकिस्तानवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष तीव्र झाला आहे. तुर्की आणि इतर देशांच्या शस्त्रांवर अवलंबून राहून, पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी भारतातील २० हून अधिक शहरांना लक्ष्य केले, परंतु भारताने त्यांचे सर्व ड्रोन पाडले. यामुळे परकीय शस्त्रांच्या बळावर लढण्याचा पाकिस्तानचा अभिमान भंग झाला.
आता भारतीय लष्कर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे. तसेच भारताने इस्लामाबादसह त्यांच्या अनेक लष्करी तळांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.