1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मे 2017 (11:35 IST)

भारतीय लष्कराकडून दोन पाकिस्तानी बंकर्स उद्धवस्त

indian army destroy two pakistani military camps
भारतीय लष्कराने दोन पाकिस्तानी बंकर्स उद्धवस्त केले असून, त्यामध्ये सात पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. जम्मू मेंढरमधील क्रिष्णा घाटीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या किरपान आणि पिंपल भागातील दोन पाकिस्तानी बंकर्स भारतीय लष्कराच्या हल्ल्यात उद्धवस्त झाले आहेत. हल्ला झाला त्यावेळी एका बंकरसमध्ये 647 मुजाहिद्दीन बटालियनचे पाच ते आठ सैनिक तैनात होते. सोमवारी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेच्या आत २५० मीटरपर्यंत घुसलेल्या पाकिस्तानी विशेष दलाच्या जवानांनी दोन भारतीय जवानांना मारले त्यानंतर या जवानांचे शीर कापून मृतदेहाची विटंबना केली.