ऑनलाईन रेल्वे बुकिंग सेवाशुल्क मुक्त
आयआयसीटीसी या वेबसाइटवरून ऑनलाइन ट्रेन तिकीट काढणार्यांना सर्व्हिस टॅक्स (सेवा शुल्क) माफ करण्यात आला आहे. 23 नोव्हेंबर 2016 पासून 31 डिसेंबरपर्यंत 2016 पर्यंत ऑनलाइन तिकीट बुक करणार्यांना कोणत्याही प्रकारचा सर्व्हिस टॅक्स लागणार नाही आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे.
रेल्वेच्या स्लीपर कोचच्या बुकिंग 20 रुपये सर्व्हिस टॅक्स आकारण्यात येत होता. तर एसी कोचच्या बुकिंगला हाच टॅक्स 40 रुपयांपर्यंत द्यावा लागत होता.