बुधवार, 31 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: चेन्नई , मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017 (12:36 IST)

जयललितांच्या रक्तात झाला होता संसर्ग

jailalita
अवयव निकामी झाल्याने झाला मृत्यू, डॉक्टरांचा खुलासा 
तमिळनाडूच्या दिवंगत  मुख्यमंत्री जयललिता यांच्या रक्तात संसर्ग (सेप्सिस) झाला होता. संसर्ग त्यांच्या अवयवांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. उपचार सुरु असताना जयललितांचा मृल्यू झाला, असा खुलासा डॉ. रिचर्ड बेले यांनी केला आहे. 
 
दरम्यान, जयललिता यांच्या मृत्यूबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवांचे डॉ. बेले यांनी खंडन केले आहे. जयललिता यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चेन्नईंतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले  होते. लंडनचे प्रसिध्द डॉ. बेले यांनी शेवटच्या दिवसात त्यांच्यावर उपचार केले होते.