मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (19:54 IST)

जम्मू काश्मीर: बारामुल्लामध्ये नव्याने सुरू झालेल्या दारूच्या दुकानावर दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या दारूच्या दुकानावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले. जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. रात्री 8.10 च्या सुमारास बारामुल्ला येथे नव्याने सुरू झालेल्या दारूच्या दुकानात ग्रेनेड फेकण्यात आला, ज्यात या दारू दुकानातील 4 कर्मचारी जखमी झाले. त्यांना जीएमसी बारामुल्ला येथे नेण्यात आले जेथे त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू झाला. हे सर्वजण जम्मू विभागातील आहेत.
 
या हल्ल्यात रणजित सिंग यांचा मृत्यू झाला. गोवर्धन सिंग, रवी कुमार आणि गोविंद सिंग हे जखमी झाले आहेत.