गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2017 (10:00 IST)

पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट भागात पाकिस्तानी सैन्याने शनिवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. गोळीबारात गंभीर जखमी झालेले लान्स नायक मोहम्मद नासीर यांचा रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली. 
 
पाकिस्तानी सैन्याने राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट आणि बालाकोट सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीश मेहता यांनी दिली. पाकिस्तानने दुपारी गोळीबार सुरु केला. छोटया स्वयंचलित शस्त्रांनी पाकिस्तानने भारतीय सैन्य चौक्यांना  लक्ष्य केले.