1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 1 जानेवारी 2024 (14:15 IST)

जमशेदपूर: न्यु इयर पार्टीनंतर 6 जणांचा अपघाती मृत्यु, दोघे जखमी

झारखंडच्या जमशेदपूर येथे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी काळाने झडप घातली. आणि अपघातात सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. 31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाची पार्टी आटपून हे सर्व जण घरी परतताना बिष्टुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्किट हाउस एरिया परिसरात  गोल सर्कल येथे ही दुर्देवी घटना घडली.वेगवान कार अनियंत्रित होऊन डिव्हाइडरला जाऊन आदळली आणि नंतर झाडाला जाऊन आदळून अपघात झाला.

या अपघातात सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की,आवाज दूर पर्यंत आली.असे स्थानिकांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळतातच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी  जाऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. पोलिसांनी प्रकरणांची नोंद केली असून पुढील तपास लावत आहे. या अपघातात दोघे जण जखमी झाले आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
Edited By- Priya DIxit