शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान जखमी

सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा परिसरात हा हल्ला झाला.

बीएसएफच्या जवानांचा ताफा वडीपोरा गावाहून पुढच्या दिशेने जात असताना हल्ला झाला. यात गोळी लागल्याने एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हेड कॉन्स्टेबल सतिंदर सिंह असे जखमी जवानाचे नाव आहे. गेल्या 36 तासांमधील या परिसरातला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.