भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचे निधन
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता (७७) यांचे निधन झाले आहे. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. साल १९६२ पासून त्या राजकरणात सक्रीय होत्या. त्यांनी नगरसेविकेपेसून ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास केला. वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी ऊर्जामंत्रीपद भुषविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयवंतीबेन मेहतांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.