मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (09:36 IST)

जेईई मेन परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार, मार्गदर्शक सूचना जाहीर

दोन वेळा पुढे ढकलण्यात आलेली जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. 
 
करोनामुळे अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची अधिक काळजी घेतली जाणार आहे. विशेषत सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. सॅनिटायझेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक तास लवकर हजर व्हावं लागणार आहे.
 
-विद्यार्थ्यांना केंद्रावर येण्यासाठी वेळेचा स्लॉट देण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलवलं जाणार आहे.
-परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचे जेईई मेन २०२० प्रवेश पत्र आणि ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असणार आहे. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही वस्तू सोबत नेण्यास परवानगी नसणार आहे.
-परीक्षा केंद्रावर कोणत्याही पिशव्यांना परवानगी दिली जाणार नाही.
-परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिगचं पालन करणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी क्रमांक असलेल्या आसनावरच बसावं.
-पेपर-२ साठी विद्यार्थ्यांना त्यांचे भूमिती बॉक्स, कलर पेन्सिल आणि रंग घेण्याची परवानगी असणार आहे. मात्र, वॉटर कलर वापरता येणार नाही.
-विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान रफ वर्क काम करण्यासाठी एक कोरा कागद दिला जाणार आहे. त्याचबरोबर पेन, पेन्सिलही देण्यात येणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी नावं लिहावं, परीक्षा झाल्यानंतर तो पेपर शिक्षकांना परत करावा.
-विद्यार्थ्यांनी आपल्या हजेरीसोबतच आपला फोटो आणि स्वाक्षरी नीट आहे की, नाही याची खात्री करून घ्यावी. तसेच अंगठ्याचा ठसा देखील योग्य पद्धतीनं द्यावा.