रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 14 जून 2017 (17:23 IST)

खासदार राजू शेट्टी यांना जेट एयरवेजचा फटका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना जेट एयरवेजचा फटका बसला. बोर्डिंग पास घेऊनही राजू शेट्टी यांना न घेताच विमानाने उड्डाण केलं. याप्रकरणात राजू शेट्टी हे मुंबईहून दिल्लीला जात होते. त्यांनी  विमानाचं बिझनेस क्लासचं तिकीट घेतलं. ते तासभर आधीच मुंबई विमानतळावर पोहोचले होते. विमानतळावर त्यांनी रितसर बोर्डिंग पास घेतला होता. प्रवासाला वेळ होता म्हणून ते लॉन्जमध्ये येऊन बसले. त्यांनी रजिस्टरमध्ये नोंदही केली. खासदार राजू शेट्टी हे कधीही प्रोटोकॉल घेत नाहीत. तसेच मदतनीसही घेत नाही. काही वेळाने ते बोर्डिंगसाठी लॉन्जबाहेर आले. मात्र बोर्डिंगद्वार बंद झाल्याचे त्यांना कळवण्यात आले. बोर्डिंग पास घेतलेला असूनही असे विसरुन जाणे हा विमान कंपनीचा हलगर्जीपणा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.  मात्र जेट एअरवेजने थेट हात वर केले. त्यावेळी जेट एअरवेजने बदली तिकीटासाठी  दोन हजार रुपये वसूल केले.