शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 डिसेंबर 2023 (19:30 IST)

Karnataka : 2 वर्षाच्या चिमुकल्याला कार ने चिरडले

child death
कर्नाटकाच्या बिदर येथे मुख्य रस्त्यावर रास्ता ओलांडताना एका 2 वर्षाच्या चिमुकल्याचा कार ने चिरडून दुर्देवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सदर घटना मंगळवारी संध्याकाळी घडली आहे. रस्त्यावर खेळताना एक लहान मुलगा भरधाव वेगाने येणाऱ्या कार खाली चिरडला गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सोशल मिडियावर प्रचंड वेगानं व्हायरल झाली आहे. कन्नड वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. 

या व्हिडीओ मध्ये रस्यावर लहान मूल खेळताना दिसत आहे. मुलाचे लक्ष खेळण्याकडे होते. तेवढ्यात वेगानं येणारी कार ने टर्न घेतला आणि त्याला लहान मुलगा दिसला नाही आणि तो चिमुकला कारच्या खाली आला. दुसऱ्या कार मध्ये बसलेली व्यक्ती त्या कार चालकाला आवाज देऊन सावध करते. तरीही कारचालक न ऐकता कार घेऊन पळ काढतो. घटनास्थळी लोक जमा होतात. मुलाचा जागीच दुर्देवी मृत्यू होतो. 

या अपघाताचा आरोपी कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा  डोंगर  कोसला असून मुलाचे मृतदेह पाहून आईने टाहो फोडला.  
 
Edited By- Priya DIxit