1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

केजरीवाल यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाने  आचारसंहिताभंग केल्याप्रकरणी  नोटीस बजावली आहे. गोव्यात साखळी येथील सभेत त्यांनी मतदारांना इतर पक्षांनी पैसे दिल्यास ते स्वीकारण्याचे आवाहन केले होते.

'निवडणुकीत कुणी पैसे घेऊन आले तर ते नको म्हणू नका, पाच हजार दिल्यास तीन पटीने अधिक मागणी करा आणि नव्या करकरीत नोटा घ्या, परंतु मतदान मात्र आम आदमी पार्टीच्या झाडूसाठीच करा' असे आवाहन केजरीवाल यांनी जाहीर सभेत केले होते. याप्रकरणी त्यांनी आचारसंहिता तोडल्याची तक्रार भाजपने केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने नोटीस बजावली आहे.