1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (14:28 IST)

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचं निधन

keshubhai patel
कोरोना काळात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना (narendra modi) मोठा धक्का बसला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी केशुभाई पटेल यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांना शुक्रवारी श्वास घेण्यासाठी अचानक त्रास होऊ लागल्यामुळे तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
 
गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांचे सर्वात निकटवर्तीय होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केशुभाई यांनी दोन वेळा गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता.
 
केशुभाई पटेल यांनी 1995मध्ये प्रथम गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी 1998 ते 2001 या काळात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांनी राज्यात सहा वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या. केशुभाई पटेल यांनी 2012 साली भाजप सोडून आपला 'गुजरात परिवर्तन पार्टी' हा नवा पक्ष स्थापन केला.