गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (12:20 IST)

‘गँगरेप पीडित’ तरुणी रिक्षात बसली का ? भाजपा खासदार किरण खेर

किरण राव यांनी अकलेचे तारे तोडले आहे. यामध्ये त्यांनी ‘गँगरेप पीडित’ तरुणीला जबाबदार धरले आहे. त्यामुळे आता भाजपा चांगलाच अडचणीत आला आहे, यामध्ये त्या म्हणतात की "रिक्षामध्ये आधीच तीन पुरुष बसले होते, तर ‘गँगरेप पीडित’ तरुणीने थोडा कॉमन्स सेन्स का राखला नाही. तिने  रिक्षात बसायला नको होतं, असं वक्तव्य भाजप खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांनी केलं.  सोशल मीडिया आणि  सर्व स्तरातून टीकेची झोड उठवली जात आहे.
 

चंदिगढमध्ये 17 नोव्हेंबर रोजी 21 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. रिक्षाने घरी परतताना हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे.

तरुणीने थोडीशी बुद्धी लावायला हवी होती. सगळ्याच मुलींना मला सांगायचं आहे. जर आधीच रिक्षात तीन पुरुष होते, तर त्यात बसायला नको होतं. असे मुर्खासारखे वक्तव्य किरण राव यांनी केले आहे. त्यामुळे किरण राव यांना नागरीका आणि विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.